Pune : विद्यापीठ चौकातील कारंज्याच्या आठवणींना अंकुश काकडेंकडून उजाळा

Ankush Kakade reminisces about the fountain at University Chowk : फेसबुकवर जुना फोटो केला पोस्ट

एमपीसी न्यूज – पूर्वीच्या पुणे विद्यापीठ चौकात त्यावेळी तेथील उंच उडणाऱ्या कारंज्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी सायंकाळी अनेक लहान मुलं, तरुण – तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. ते जुने पुणे आता हरवले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी महापौर अंकुश काकडे यांनी या कारंज्याच्या आठवणींना उजाळा दिला.

किर्लोस्कर उद्योग समूहाने पुणे विद्यापीठ चौकाचे सुशोभीकरण केले होते. त्याचे उदघाटन तत्कालीन महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून पुणे विद्यापीठ चौक ओळखला जात असे. त्याच्या पलिकडेच औंध गाव, बाणेर गाव, पाषाण गाव सुरू होत असे, अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली.

एक जुनी आठवण म्हणून फेसबुकवर जुना फोटो पोस्ट करून अंकुश काकडे यांनी उडणाऱ्या कारंज्याच्या आठवणींना उजाळा दिला. औंध, बाणेर आणि पाषाण भागाचे आता गावपण हरविले आहे. या भागात आता अनेक टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे.

पुण्याचे ‘नरिमन पॉईंट’म्हणून बाणेरला ओळखले जाते. दरम्यान, शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी या भागातील अडचणीचे ठरलेले उड्डाणपूल पाडायला सुरुवात झाली आहे.

लवकरच या भागांत दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठाचे प्रवेशद्वारही हलविण्यात येणार आहे. 700 कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

View this post on Instagram

विद्यापीठ चौकातील कारंज्याच्या आठवणींना अंकुश काकडेंकडून उजाळा . पूर्वीच्या पुणे विद्यापीठ चौकात त्यावेळी तेथील उंच उडणाऱ्या कारंज्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी सायंकाळी अनेक लहान मुलं, तरुण – तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. ते जुने पुणे आता हरवले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी महापौर अंकुश काकडे यांनी या कारंज्याच्या आठवणींना उजाळा दिला. . For more details check out our website Link in bio . Photo by ankush kakade . #mpcnews #i_support_mpcnews #ankushkakade #oldpune #pune #punekars #punevidyapith #vidyapith #universitychowk #puneuniversity #puneuniversityroad #marathinews #marathinewsupdates

A post shared by MPC News Pvt. Ltd. (@mpcnews.in) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.