Mahalunge : पेट्रोलचे पैसे न देता पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर त्यांनी गाडीत पेट्रोल (Mahalunge) टाकले मात्र त्याचे पैसे मागताच त्यांनी दहशत पसरवत उलट पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार 19 एप्रिल 2023 रोजी मध्यरात्री चिंबळी फाटा येथील शेल पेट्रोल पंपावर घडली.
Maharashtra News : चक्क एकट्या बैलासमोर तास दोनतास नाचली गौतमी पाटील
याप्रकरणी गुरुवारी (दि.27) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आशिष राधाकिशन सिंग राजपूत (वय 34 रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून गौरव धर्मराज भुमकर, शिभम अनंता लोखंडे (दोघे. रा.चिंबळी) व त्यांचा साथीदार कृष्णा यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पेट्रोलपंपावर काम करत असताना आरोपी त्यांच्यादुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला गाडीमध्ये 220 रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले. पेट्रोल भरल्यानंतर त्यांनी फिर्यादीला पैसे दिले नाहीत. फिर्यादींनी आरोपींकडे पैसे मागितले असता त्यांनी आरडा-ओरड करत आम्ही कोण आहोत माहित नाही का म्हणत धक्काबुक्की केली.
तसेच फिर्यादीच्या खिशातील ग्राहकांनी दिलेले दिड हजार रुपये काढून घेतले. फिर्यादीला काचेची बटल व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. तसेच तुमचा पेट्रोलपंप लुटून नेवू व तुला सोडणार नाही अशी धमकी दिली.यावरून (Mahalunge) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.