Chakan : स्वर्ग रथाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – स्वर्ग रथाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. (Chakan) त्याच वेळी दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने वृद्धाला चिरडले. यात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 26) रात्री सव्वा दहा वाजता आंबेठाण चौक, चाकण येथे घडला.

अशोक गोविंद देवकर (वय 65) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दिगंबर अंबादास डोंगरे (वय 38, रा. वाघोली, ता. हवेली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वर्ग रथ टेम्पो (एमएच 14/ईएम 2058) चालक गायके (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), ट्रक चालक (एमएच 04/केयु 0190) प्रल्हाद अंकुश सानप (वय 21, रा. पिंपळेची वाडी, ता. शिरूर, जि. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravet : मेंढ्यांच्या कळपातून चार मेंढ्या, एक बोकड चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून किसन अंबादास माने आणि अशोक देवकर यांच्यासोबत जात होते. मंचर येथून वाघोलीकडे जात असताना आंबेठाण चौकात आरोपी गायके याने त्याच्या ताब्यातील स्वर्गरथाने दुचाकीला धडक दिली. फिर्यादी डोंगरे आणि माने हे जागेवर खाली पडले. (Chakan) तर देवकर हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडले. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने देवकर यांना चिरडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.