Maharashtra Budget Session 2023 LIVE : अधिवेशनाच्या पाचव्या दिवसाला सुरूवात, मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

एमपीसी न्यूज : राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. आज अनेक मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. या शिवाय मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसादही आज अधिवेशनात पडण्याची शक्यता आहे. 

 

दुपारी 12:50 PM : पोलिस भरतीवेळी उमेदवारांची होणारी गैरसोय दूर करा, अजित पवार यांची विधानसभेत मागणी

पोलिस भरतीवेळी उमेदवारांना त्रास, मृत्यूच्या दुर्घटना टाळण्यासाठी

धावण्याची चाचणी पहाटे 4 ते सकाळी 10 वेळेत घेण्याची मागणी

विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पोलिस भरती केंद्रांवरच्या गैरसोयींचा मुद्दा उपस्थित

पोलिस शिपाई भरतीसाठी, इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, एमएस्सी झालेले तरुण येत आहेत. गावखेड्यातल्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ही मुलं आहेत

उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या नसल्यानं हे तरुण पोलिस भरतीसाठी येत आहेत. त्यांची काळजी घेणं ही आपली, शासनाची जबाबदारी आहे.


 

दुपारी  12:03 PM : अंगणवाडी सेविकांचा 20 टक्के पगार वाढ

 

अंगणवाडी सेविकांचा 20 टक्के पगार वाढ केली जाणार.

मे महिनापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार

अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी 150 कोटी खर्च केले जाणार

मनपा क्षेत्रात 200 कंटेनर अंगणवाड्या सुरू करतो

अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे.


 

दुपारी 12:00 PM : मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

अंगणवाडी सेविकांचं मानधन 20 टक्क्यांनी वाढणार

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून विधानसभेत गोंधळ

आक्रमक झालेल्या विरोधकांचा सभात्याग


 

सकाळी 11:47 AM : किमान पुढच्या अधिवेशनाच्याआधी तरी आश्वासन दिलेल्या बैठका लावा; अजित पवार संतापले

 

विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत याबाबत संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका किमान पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी तरी लावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.


 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.