Maharashtra Corona Update : दिवसभरात 782 कोरोना रुग्णांची नोंद, 1,361 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (रविवारी) दिवसभरात 782 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 1,361 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली असून, सध्या 7,228 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 65 हजार 298 एवढी झाली आहे. आजवर 77 लाख 10 हजार 376 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.03 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 43 हजार 697 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजवर 7 कोटी 78 लाख 24 हजार 854 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 744 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1,36,445 जण होम क्वारंटाईन आहेत.

ओमायक्रॉन अपडेट

महाराष्ट्रात आज एकही नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली नाही. आजवर राज्यात 4,629 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 4,456 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.