Maharashtra Corona Update : मोठा दिलासा! राज्यात वीस हजारांहून कमी ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या घटली आहे. गुरुवारी राज्यात 1 हजार 418 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून, ती वीस हजाराच्या खाली आली आहे. सध्या राज्यात 18 हजार 748 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 64 लाख 45 हजार 454 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गुरुवारी 2 हजार 112 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.54 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 40 हजार 134 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

लसीकरणात देखील महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, राज्यात आतापर्यंत 9 कोटी 67 लाख 45 हजार 760 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.