Maharashtra Corona Update : राज्यात आज 9,489 नवे रुग्ण; 8,395 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात राज्यात 9 हजार 489 नवीन कोरोना बाधित आढळले असून, 8 हजार 395 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय अद्यापही राज्यात कोरोना बाधितांच्या मृत्यू संख्येत दररोज भर पडतच आहे. आज राज्यात 153 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्याती मृत्यू दर 2.01 टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 58 लाख 45 हजार 315 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 17 हजार 575 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 23 लाख 20 हजार 880 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 88 हजार 841 (14.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 32 हजार 949 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 4 हजार 422 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत दिवसभरात 7 लाख 96 हजार 738 नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 38 लाख 57 हजार 372 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.