Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा घट्ट होतोय! आज 41,434 नवे रुग्ण, 133 ओमायक्रॉन बाधित

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) 41 हजार 434 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 20 हजार 318 रुग्ण मुंबईमधील आहेत. आज 133 ओमायक्रॉन बाधितांची राज्यात भर पडली असून, त्यातील 118 ओमायक्रॉन बाधित रुग्ण पुणे मनपा हद्दीतील आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 68 लाख 75 हजार 656 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 57 हजार 081 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 9 हजार 671 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 95.37 टक्के एवढा झाला आहे.

 

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून, सध्या 1 लाख 73 हजार 238 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 1 लाख 06 हजार 037 ॲक्टिव्ह रुग्ण मुंबईत आहेत. आज दिवसभरात 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.05 टक्के एवढा आहे.

 

राज्यात आजवर 7 कोटी 03 लाख 42 हजार 172 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या 8 लाख 45 हजार 089 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1,851 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात एक हजाराहून अधिक ओमायक्रॉन बाधित

आतापर्यंत 1,009 ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक 566 रुग्ण मुंबईतील, 201 पुणे मनपा तर 53 पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 1,009 रुग्णांपैकी 439 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.