Maharashtra MLC Election Result : विधानपरिषदेचा पहिला निकाल हाती, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

एमपीसी न्यूज : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघ निवडणुकीतील पहिला विजय हाती आला आहे. (Maharashtra MLC Election Result) कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.

ज्ञानेश्वर म्हात्रे पहिल्याच फेरीत विजयी झाले आहेत. त्यांना 20648 मतं मिळाली, तर शिक्षकांची 3002 मते अवैध ठरली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयी मताचा 16 हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.

Chinchwad Bye-Election : पक्षाच्या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादीच्या नाना काटे यांनी घेतला उमेदवारी अर्ज

ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता तो विश्वास आज सफळ झाला आहे. रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे हा विजय सुकर झाला. हा शिक्षकांचा, 33 संघटनांचा विजय आहे. मला 20 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहे. जो कोटा गरजेचा होता तो पहिल्याच फेरीत पूर्ण झाला आहे, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयानंतर दिली.

“आझाद मैदानावर आंदोलनं करुन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन अनुदानाचा प्रश्न सोडवला होता. आता पेंशनचा प्रश्न सोडवायचा आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “हा शिक्षकांनी घेतलेला बदला आआहे. कारण सहा वर्ष शिक्षकांची कामं झाली नव्हती,असा त्यांचा आरोप होता. (Maharashtra MLC Election Result)  त्याउलट साडेआठ हजार शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची, संस्थांची कामं मी स्वत: वेळ देऊन केली आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझ्या विजयात असेल. बाळाराम पाटील यांनी पराभवी स्वीकारुन माझं अभिनंदन केलं यासाठी त्यांचे आभार,” असंही ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.