Maharashtra : खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

आज वरोरा येथे अंत्यदर्शन; उद्या अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज-चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात ( Maharashtra) आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे.बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे.

चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते.शुक्रवार 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारा दरम्यान रुग्णालयात आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटानी अखेरचा श्वास घेतला.

Pune : कॉसमॉस बँकेचे संचालक राहिलेल्या मुकुंद अभ्यंकर यांना 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत 2014 मध्ये ते आमदार म्हणून भद्रावती वरोरा विधानसभेतून निवडून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसकडून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले.

 

त्यांचे पार्थिव आज (30 मे) दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर  31 मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात ( Maharashtra) येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.