Maharashtra News : पाचवी आणि आठवी मधील विद्यार्थ्यांचा मूल्यमापनाचा आज निकाल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने (Maharashtra News ) पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले आहे. त्याचा निकाल आज (गुरुवारी, दि. 24) दुपारी एक वाजता ऑनलाईन माध्यमातून जाहीर होणार आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्रधान सचिव माणिक बांगर यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या सात विभागीय मंडळामार्फत इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) आणि इयत्ता आठवी (उच्च प्राथमिक स्तर) मधील विद्यार्थ्यांचे 20 ते 30 जून या कालावधीत मूल्यमापन करण्यात आले. या मुल्यामापनाचा निकाल गुरुवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

Seema Deo : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

हा निकाल www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रत घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना पाचवी आणि आठवी पर्यंतची आर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र मंडळाकडून (Maharashtra News) दिले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.