Pune : इंडो एथलेटिक सोसायटीतर्फे हुतात्मा राजगुरु यांना 115 व्या जयंतीनिमित्त मानवंदना

एमपीसी न्यूज – देशातील विविध स्वातंत्र्यवीरांना (Pune) इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे दरवर्षी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमीत्त आज (गुरुवारी) हुतात्मा राजगुरू यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त पुणे येथील नाशिक फाटा पासून ते राजगुरुनगर आणि राजगुरुनगर पासून परत नाशिक फाटा अशी सत्तर किलोमीटरची सायकल राईड आयोजित करण्यात आली.

साधारणता शंभर सायकलिस्ट त्याच्यामध्ये सहभागी झाले. सदर सायकल राईड चे नेतृत्व संदीप जी परदेशी , दादासाहेब नखाते, हरिप्रिया शशिकुमार व उर्मिला मोरे यांच्यातर्फे करण्यात आले. हिंदू अथलेटिक सोसायटीचे अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्यातर्फे झेंडा दाखवून नाशिक फाटा येथून सुरुवात करण्यात आली.

Maharashtra News : पाचवी आणि आठवी मधील विद्यार्थ्यांचा मूल्यमापनाचा आज निकाल

सकाळी पाच वाजता पुणे पिंपरी चिंचवड येथील सर्वजण नाशिक फाटा येथे जमा झाले, छत्रपती शिवरायांचा जय घोष करत सायकल राईड ला सुरुवात झाली. सायकल राईटचा मार्ग नाशिक फाटा भोसरी चाकण कुरळी राजगुरुनगर असा होता परतीचा मार्ग देखील हाच होता अशा प्रकारे साधारणतः 70 किलोमीटर अंतर सर्व सायकलिस्ट द्वारे पार करण्यात आले आणि हुतात्मा राजगुरूंना मानवंदना देण्यात आली. असे इंडो अथलेटिक सोसायटीचे (Pune) गिरीराज उमरीकर यांच्यातर्फे सांगण्यात आले.

या सायकल राईड मध्ये मनोज चोपडे, गणेश आगाशे, बाळासाहेब तांबे, अमित नखाते, अजय शीलवंत, दीपक तिळवे, जयंत नाईक, कुमार हवलदार, राजेश पाटील, प्रदीप जी टाके, सिद्धू कलशेट्टी, प्रशांत सगरे, श्रीकांत रोडे , दिलीप शिंदे, दीपक बुरूकुल, लक्ष्मण बिरादार, दिनेश सहाने , प्रज्ञा बडगे, नितेश चंदगडकर, महेश मेले, वसंत भारंगे, सचिन सिंह, संदीप मनीकम, मोजेस सगलगीले, तुषार पातूर्डे, केशव मोरे आदींनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.