Maharashtra News : शरद पवारांशी बोलणे झाले…मी खंबीर आहे….उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू-संजय राऊत

एमपीसी न्यूज –राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ झाली आहे.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Maharashtra News) शपथ घेतली आहे.राष्ट्रवादीच्या 54 पैकी 30 आमदारांनीदेखील सरकारला पाठिंबा दिला  आहे. या सगळ्या खळबळजनक घटनेनंतर संजय राऊत यांनी आपल्या ट्विवटरद्वारे प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही”, असं संजय राऊत यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.https://www.youtube.com/watch?v=5quPBQuWVxo&pp=ygUIbXBjIG5ld3M%3D

शरद पवार यांनी प्रत्यक्ष अजून कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. परंतू  थोड्याच वेळात शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत (Maharashtra News) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.