Maharashtra News : कर्तुत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेंव्हा अशा घटना घडतात – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री (Maharashtra News) एकनाथ शिंदे म्हणाले की, “कर्तुत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेंव्हा अशा घटना घडत असतात.”

Pimpri : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे ‘शिंदे-फडणवीस-पवार’ सरकारसोबत

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.

शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, “राज्याच्या विकासासाठी मी अजित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा देतो. कर्तुत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेंव्हा अशा घटना घडत असतात. डबल इंजिनच्या सरकारला तिसरे इंजिन जोडले आहे. यामुळे राज्याचा विकास वेगाने होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.