Pimpri : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे ‘शिंदे-फडणवीस-पवार’ सरकारसोबत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. या त्रिकोणी सरकारच्या शपथविधीला पिंपरीचे (Pimpri ) राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार अण्णा बनसोडे हे उपस्थित होते. त्यामुळे हे ते अजित पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Politics : अजित पवार शपथ वेळी उत्सुकतेच्या नादात विसरले राज्यपालांना!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे.  अजित पवार हे रविवारी अचानक आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनात दाखल झाले. पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीवेळी अजितदादांचे कट्टर समर्थक असलेले पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  अण्णा बनसोडे हे उपस्थित होते. त्यामुळे सुरुवातीपासून अजितदादांसोबत असलेले बनसोडे यावेळी देखील त्यांच्यासोबत आहेत.

त्यामुळे पिंपरी (Pimpri ) -चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार बनसोडे हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीवेळी देखील बनसोडे हे शेवटपर्यंत अजितदादांसोबत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.