Maharashtra Police : बॉम्ब शोधक श्वानाचा अर्धांगवायूच्या झटक्यानंतर मृत्यू

अमरावतीच्या 'शान'वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज – अमरावती शहर पोलीस दलात बॉम्ब शोधक (Maharashtra Police) म्हणून मागील काही वर्षांपासून काम करणाऱ्या ‘शान’ या श्वानाला अर्धांगवायूचा झटका आला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. ‘शान’वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

3 ऑक्टोबर 2017 रोजी लॅब्राडोर प्रजातीचा श्वान ‘शान’ हा अमरावती शहर पोलीस दलात दाखल झाला. तो बॉम्ब शोधक कार्यात पारंगत होता. त्याने अमरावती शहर पोलीस दलात काम करत असताना अनेक अतिमहत्वाच्या बंदोबस्तात उत्कृष्ठ कामगिरी केली.

शानचा जन्म मे 2016 मध्ये झाला. त्याचे आता 7 वर्ष 6 महिने वय होते. पुढील वर्षी तो पोलीस सेवेतून सेवानिवृत्त होणार होता. दरम्यान तो मागील काही दिवसांपासून आजारी पडला. त्यातच 7 नोव्हेंबर रोजी त्याला अमरावती पोलीस मुख्यालयात असताना अर्धांगवायूचा झटका आला.

Jejuri : श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेसाठी हजारो भाविक जेजुरीत दाखल

शानचे हॅन्डलर आणि अमरावती पोलिसांनी त्याला तात्काळ नागपूर येथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. त्याला नागपूर येथे घेऊन जात असताना वाटेत त्याची प्राणज्योत मालवली. अमरावती शहर पोलीस दलात त्याने अनेक चांगल्या कामगिरी केल्या असल्याने तो सर्वांचा चाहता होता.

शानच्या निधनामुळे पोलीस दलातील अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. शानवर अमरावती शहर पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त विक्रम राजे, शानचे हॅन्डलर यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण (Maharashtra Police) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.