Maharashtra :आज होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा 3 ऑगस्ट रोजी होणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra) शुक्रवारी (ता.28) होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर दहावीचा शुक्रवारी होणारा पेपर पुढे ढकलला असून हा पेपर आता 3 ऑगस्ट रोजी होणार आहे.

राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2023 मधील दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहे. यात दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट, तर बारावीची 18 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होत आहे. परंतु, सध्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टीदेखील जाहीर केली आहे.

Pune : नवले ब्रीज ते कात्रज चौकापर्यंतच्या खोदकामामुळे विजवाहिन्या तुटतात; महावितरणचा ठपका

या पार्श्वभूमीवर दहावीच्या पुरवणी परीक्षेतील शुक्रवारी होणारा सामाजिक शास्त्रे पेपर-एक, इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर पुढे ढकलला आहे. हा पेपर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणार होता.

आता हा पेपर 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या (Maharashtra) सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.