Pune : डंपरच्या धडकेत महिला जखमी; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

एमपीसी न्यूज : सिंहगड रस्त्यावर रस्ता ओलांडताना (Pune) एका महिलेला डंपरने धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली. हा अपघात 24 जुलै रोजी सिंहगड रस्त्यावर रोहन कृतिका सोसायटीच्या समोरील सिग्नलवर घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली.   

सिंहगड रोडवर असणाऱ्या सिग्नलला ही महिला झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत होती. त्याच वेळी सिग्नल सुटला आणि डंपर चालकाला ती न दिसल्याने त्याने तिला धडक दिली. डंपर पुढे गेल्यानंतर ही महिला जागेवर उठून बसली.

Maharashtra :आज होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा 3 ऑगस्ट रोजी होणार

रस्त्यावरील नागरिकांनी तिला जखमी अवस्थेत पाहताच तिला रस्त्याच्या बाजूला आणले. तिच्या पायाला दुखापत झाली (Pune) असून तिला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या संदर्भात दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.