Pimpri : फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणावर हरकतींचा पाऊस

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri) फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणावर 412 हरकती आल्या आहेत. यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सर्वाधिक शंभर तर सर्वात कमी ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात सर्वात कमी 14 हरकती आल्या आहेत. हरकती निकाली काढल्यानंतर शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेनंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

उद्योग, कष्टक-यांची नगरी अशी ओळख असलेल्या शहरात कामगार, कष्टकरी, उद्योजक यांचा अधिवास अधिक आहे. शहरात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयात 18 हजार 603 फेरीवाले आढळून आले आहेत. यापूर्वी शहरात नऊ हजार 25 फेरीवाल्याची नोंद होती. त्यामुळे फेरीवाल्यांमध्ये तब्बल नऊ हजार 578 फेरीवाले वाढले आहेत.

शहरात सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात फेरीवाले आढळून आले (Pimpri) आहेत. त्यामुळे महापालिकेने या सर्वेक्षणावर हरकती मागविल्या होत्या. यामध्ये 412 हरकती आल्या आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक शंभर, ‘ह’ मध्ये 91, ‘फ’ मध्ये 60, ‘ग’ मध्ये 45, ‘ब’ मध्ये 43, ‘ड’ मध्ये 33, ‘क’ मध्ये 26 तर सर्वात कमी ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात 14 हरकती आल्या आहेत. या हरकतींवर सध्या काम करण्यात येत आहे.

Maharashtra : आज होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा 3 ऑगस्ट रोजी होणार

महापालिकेने बोगस सर्वेक्षण केले आहे. हरकतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. चुकीचे काम झाकण्यासाठी खासगी संस्थेकडून हरकती स्वीकारल्या जात नाहीत. फेरीवाला प्रमाणपत्र असणा-यांची नावे देखील सर्वेक्षणातून गायब केली आहेत. खासगी संस्थेने मनमानी पद्धतीने केलेले सर्वेक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष
काशिनाथ नखाते यांनी केली.

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणावर 412 हरकती आल्या आहेत. या हरकती तपासून निकाली काढल्या जाणार आहेत.  क्षेत्रीय कार्यालयांना फेरीवाल झोन करण्यासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्याचे भूमी व जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.