MK Gandhi Spectacle : महात्मा गांधींच्या चष्म्याचा किती रुपयांना झाला लिलाव, कोणी घेतला विकत ?

Mahatma Gandhi's spectacles were auctioned.

एमपीसी न्यूज – महात्मा गांधींनी घातलेला सोन्याचा मुलामा असलेला चष्मा दक्षिण आफ्रिकेत असताना एकजणाला दिला होता. ब्रिटनमध्ये पार पाडलेल्या या लिलावात महात्मा गांधींच्या चष्म्याला  विक्रमी किंमत मिळाली आहे. 

चष्म्याला लिलावात 10  हजार ते 15 हजार पाऊंड मिळतील, असा अंदाज होता, पण ऑनलाईन लिलावामध्ये ही बोली वाढत गेली आणि अखेर सहा अंकी रकमेवर ही बोली थांबली. गांधीजींच्या या चष्म्याला 2 लाख 60 हजार पाऊंड म्हणजेच 2 कोटी 55 लाख रुपयांना विकण्यात आले.

इंग्लंडच्या साऊथ ग्लुसेस्टरशायरच्या मंगोट्सफील्डमधल्या एका वृद्ध व्यक्तीने लिलावात हा चष्मा विकत घेतला आहे. हा वृद्ध व्यक्ती त्याच्या मुलीसोबत लिलावाच्या 2 लाख 60 हजार पाऊंडचे पैसे देईल.

 

ईस ब्रिस्टल ऑक्शन्स कंपनीचे लिलावकर्ते ऍण्ड्रयू स्टोव म्हणाले, अविश्वसनीय गोष्टीला अविश्वसनीय किंमत मिळाली आहे. ज्यांनी बोली लावली त्यांचे धन्यवाद. या चष्म्याच्या लिलावातून आम्ही लिलावाचा विक्रमच केला नाही, तर याचं ऐतिहासिक महत्त्वही वेगळंच आहे.

विक्रेत्या कुटुंबाकडे महात्मा गांधींचा हा चष्मा खूप आधीपासून होता. महात्मा गांधींनी 1910 ते 1930 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश पेट्रोलियममध्ये काम करत असताना हा चष्मा आमच्या नातेवाईकांना भेट म्हणून दिला होता, असं माझ्या वडिलांनी मला सांगितल्याचं विक्रेता म्हणाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.