Maratha Reservation : मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, ती पूर्ण केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज : मराठा समाजाचे नेतृत्व (Maratha Reservation) करत मनोज जरांगे पाटील यांनी गेले कित्येक महीने उपोषण केले. आणि हे उपोषण यशस्वीरित्या पूर्णही केले. आज वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा शब्द राखत मनोज जरांगे यांना ज्यूस देत मराठा आरक्षणासाठी केलेले उपोषण थांबवले. ज्या 54 लाख लोकांच्या मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना आरक्षण द्यावे आणि त्यांच्या सगेसोयराना देखील हे आरक्षण लागू करावे या दोन मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्या. ते मान्यतेचे राजपत्र घेऊन स्वत: मनोज जरांगे यांच्याकडे गेले. त्यांनी व्यासपीठावर जरांगे यांच्या आंदोलनाचे कौतुकही केले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की मी मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम केले. माझ्या मागे धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या दोन गुरूंचा आशीर्वाद आहे. आज स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या भूमीत आज हा ऐतिहासिक लढा यशस्वी झाला. त्यांनाही मी वंदन करतो. हे आमचं किंवा तुमचं सरकारनाही हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे सरकार आहे.  मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. गोरगरीब लोकांच्या अडचणी कळत आहे. मी त्यामुळेच मराठा आरक्षण देईल अशी शपथ घेतली होती.

Thergaon : शहरातील पाणीपुरवठा विस्कळित

एकनाथ शिंदे यांनी मोठे काम केले. त्यांचा असलेला समाज म्हणून विरोध आज संपला आहे. आपली जी मागणी होती, ती मान्य झाली आहे. तुम्हाला विचारून मी त्यांना बोलवण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला विचारले मुख्यमंत्र्यांना (Maratha Reservation) बोलावू तर तुम्ही हो म्हणालात. त्यांच्या हस्ते मी ज्यूस घेतले, पत्रही स्वीकारले. आपला लढा पूर्ण झाला आहे. मी मोठी विजयी सभा घेणार असून मी सर्वांना यासाठी आमंत्रित करणार आहे. त्याची तारीख लवकरच जाहीर करू.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.