Vadgaon Maval : मावळ फेस्टीव्हलची दिमाखदार सुरुवात

एमपीसी न्यूज – कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना (Vadgaon Maval ) अशी ओळख असलेला मावळ फेस्टिव्हलची दिमाखदार सुरुवात शुक्रवारी (दि. 26) झाली. मावळ फेस्टीव्हल मध्ये खेळ रंगला पैठणीचा, करून गेलो गाव विनोदी नाटक, मावळ जल्लोष 2024 असे विविध कार्यक्रम होणार आहेत. फेस्टिवलची सुरुवात खेळ रंगला पैठणीचा या महिलांच्या स्पर्धात्मक कार्यक्रमाने उत्साहात झाली.

कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना अशी ओळख असलेला मावळ फेस्टिव्हल हा दिमाखदार सोहळा दि. 26 ते 28 जानेवारी पर्यंत रंगणार असून, यामध्ये खेळ रंगला पैठणीचा, करून गेलो गाव विनोदी नाटक, मावळ जल्लोष 2024 अशा विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थापक प्रवीण चव्हाण,कार्याध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर,अध्यक्ष सुरेश जांभूळकर, कार्यक्रम प्रमुख विनायक भेगडे यांनी दिली.

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश; मुंबईत पोहचण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात होणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात शुक्रवार (दि.26) सायंकाळी 4 वाजता खेळ रंगला पैठणीचा या महिलांच्या स्पर्धात्मक कार्यक्रमाने झाली. यासाठी मानाची पैठणी, सोन्याची नथ,चांदीचा छल्ला तसेच आकर्षक (Vadgaon Maval) बक्षिसे ठेवण्यात आली. या वेळी अभिनेत्री मेघा धाडे उपस्थित होत्या व बालगोपाळांसाठी फनफेअरचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवारी (दि. 27) सायंकाळी 6 वाजता या सोहळ्याचे उद्घाटन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर, सोहळ्याचे निमंत्रक म्हणून माजी राज्यमंत्री संजय भेगडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्रीराम कलापथक पवळेवाडी सांस्कृतिक पुरस्कार, एकवीरा जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी सामुदायिक विवाह सोहळ्यास सामाजिक पुरस्कार, बैलगाडा शर्यतींचा राजा मावळ किंग ओम्या या बैलास विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी गोपूजन व अभिनेते भाऊ कदम, ओंकार भोजने यांची भूमिका असलेले करून गेलो गाव हे विनोदी नाटक होणार आहे.

रविवारी (दि.28) सायंकाळी 6 वाजता मावळ जल्लोष 2024 हा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे संयोजन पदाधिकारी अरुण वाघमारे,बंडोपंत धर्माधिकारी, पवन भंडारी,महेंद्र म्हाळसकर,सागर जाधव,शैलेंद्र ढोरे,नामदेव ढोरे,नितीन कुडे,रवींद्र काकडे,भूषण मुथा, शामराव ढोरे,किरण म्हाळसकर, शंकर भोंडवे,जितेंद्र कुडे,बाळासाहेब भालेकर,शेखर वहिले,प्रमोद म्हाळसकर,सलीम तांबोळी,दत्तात्रय लंके करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.