Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्र मिळवणारे धाराशिवमधील सुमित माने ठरले पहिले नागरिक

एमपीसी न्यूज – धाराशिव जिल्ह्यातील कारी येथील रहिवासी (Maratha Reservation) सुमित भारत माने या नागरिकास धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. शिंदे समितीच्या अहवाल आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवणारे सुमित माने हे पहिले नागरिक ठरले आहेत.

राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध ठिकाणी उपोषण करण्यात येत आहे. शिवाय काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचेही पाहायला मिळाले.

Pimple Gurav : पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने तरुणीची चार लाखांची फसवणूक

या पार्श्वभूमीवर काल सरकारने निवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्या (Maratha Reservation) समितीने सादर केलेला पहिला अहवाल स्वीकारला आहे. त्याआधारे आज धाराशिव जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील पहिले कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे.

सुमित माने या लाभार्थीचे पंजोबा कृष्णा दादा माने यांचे गाव नमुना 14 वरील 1917 चा निझामकालीन कुणबी असल्याचा पुरावा सापडल्यानंतर या मराठा असणाऱ्या सुमित मानेला कुणबी दाखला मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.