Pimple Gurav : पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने तरुणीची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पॅन कार्ड अपडेट करायचे आहे असे सांगून 20 वर्षीय तरुणीच्या बँक खात्यातून 3 लाख 98 हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. ही फसवणूक 5 ऑक्टोबर रोजी पिंपळे गुरुव येथे ऑनलाईन पद्धतीने झाली आहे.

याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून 9441490201 या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्या मोबाईल क्रमाकांवर पॅन कार्ड अपडेट करा अन्यथा तुमचे अकाऊंट बंद होईल असा मॅसेज आला.

Wakad : गोल्ड ट्रेड ॲपद्वारे सव्वा कोटीचे आमिष दाखवून वीस लाखांची फसवणूक

त्याखाली अपडेटसाठी एक लिंक आली. त्या लिंकवर पिर्यादी यांनी क्लीक केले असता, अक्सीस बँकेचे होमपेज आले. तेथे पॅन कार्ड अपडेट हा ऑपशन देण्यात आला होती.

फिर्यादी यांनी माहिती भरताच त्यांना एक ओटीपी आला. तो ओटीपी फिर्यादी यांनी आरोपीला दिला. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 1 लाख 99 हजार 968 रुपये व ट्रान्जॅक्शन द्वारे 1 लाख 98 हजार 965 रुपये असे एकूण 3 लाख 98 हजार 933 रुपये काढून घेत फिर्यादीची फसवणूक करण्यात आली.

यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.