Wakad : गोल्ड ट्रेड ॲपद्वारे सव्वा कोटीचे आमिष दाखवून वीस लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – वाकड येथे राहणाऱ्या 39 वर्षीय नागरिकाला गोल्ड  (Wakad) ॲपद्वारे   ट्रेड खरेदी करण्यास सांगून त्याला सव्वा कोटी रुपयांचे आमिष दाखवून तब्बल 20 लाख 85 हजार रुपये लुबाडले आहेत. हा सारा प्रकार 4 जुलै ते 12 ऑगस्ट 2023 या कालावधीत फोनवरून करण्यात आला आहे.

याप्रकरणी केवीन लिसा, वॉरेन व पैसे ट्रान्सफर केलेले बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi :दारूच्या नशेत गाडी चालवून नागरिकालाच अधिकारी असल्याचे सांगत दमदाटी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मोबाईल क्रमांक हा गोल्ड ट्रेडींग  (Wakad) ॲपद्वारे ॲड  करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला  लिंक पाठवून त्यावरून ट्रेड खरेदी करण्यास सांगितले.

हे ट्रेड विकून फिर्यादीच्या खात्यात 1 कोटी 23 लाख 83 हजार 302 रुपये आल्याचे भासवले. मात्र हे पैसे काढून घ्यायचे असतील तर 10 टक्के टॅक्स भरावा लागेल असे सांगितले.

त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपीच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने 20 लाख 85 हजार 330 रुपये भरले. मात्र त्यांना कोणताही मोबादला न देता फिर्यादी यांची फसवणूक कऱण्यात आली आहे. यावरून वाकड पेलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Wakad) आहेत

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.