नाटक : तेरा दिवस प्रेमाचे, “ गंभीर, विनोदी, अंतर्मुख करणारे… 

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- जन्माला आलेला माणुस हा एक दिवस मृत्यू पावतो, त्या नंतर चे वातावरण गंभीर बनून जाते, शेजारधर्म म्हणून प्रत्येक जण त्या व्यक्तीला मदत करतो, पण त्यामध्ये सुद्धा व्यक्ती तितक्या प्रकृती हे असतेच, अश्याच एका घटनेनंतर “ तेरा दिवसात “ काय होते हे लेखक आनंद म्हसवेकर यांनी विनोदाच्या माध्यमातून “ तेरा दिवस प्रेमाचे “ ह्या नाटकात मांडले आहे.

प्रयोग फेक्तरी आणि जिव्हाळा निर्मित तेरा दिवस प्रेमाचे ह्या नाटकाची निर्मिती अनुराधा सामंत यांनी केली आहे, लेखन आनंद म्हसवेकर यांचे असून शिरीष राणे यांनी दिग्दर्शन केले आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाश योजना विनय आनंद, यांची असून वेशभूषेची जबाबदारी जुईली पारखी हिने सांभाळलेली आहे. या मध्ये अरुण नलावडे, माधवी दाभोलकर, शर्वरी गायकवाड, देवेश काळे, सूचित ठाकूर, नीता दिवेकर, संजय देशपांडे ह्या कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत.

मुंबई मधील एका सोसायटीमध्ये श्रीयुत प्रभाकर वझे यांच्या घरी त्यांच्या बायकोचे निधन झालेले असते प्रभाकर वझे हे हे एक नामांकित मालिका दिग्दर्शक असतात, त्यांच्या शेजारी अविनाश राउत आणि सौ कांचन राउत हे कुटुंब राहत असते सौ कांचन राउत ह्या वझे यांना शेजारधर्म म्हणून मदत करीत असतात पण हे अविनाश राउत यांना मान्य नसते, अविनाश राउत हे संशयी, रागीट, हेकेखोर अश्या स्वभावाचे असतात, त्यांना अन्वय नावाचा मुलगा असून तो शेजारच्या प्रिया वझे हिच्यावर प्रेम करीत असतो. त्यामुळे तो आपल्या परीने तिची काळजी घेतो, प्रिया वझे हिच्या आईचे निधन झाल्याने ती दुखी: असते तरी ती मनाने खंबीर असते. ह्या प्रसंगातून ती स्वतःला सांभाळत असतानाच त्यांच्या घरी स्त्री मुक्ती संघटनेची अध्यक्षा रेखा सावे ह्या आणि त्यांच्या मागोमाग वझे यांचे सासरे त्यांनी वझे यांच्या विरोधात तक्रार केल्याने चौकशी साठी एक हवालदार त्यांच्या घरात येतो आणि नाट्यमय घटनांना सुरवात होते..

प्रत्येक माणसामध्ये चांगले-वाईट गुण लपलेले असतात, अश्याच ह्या व्यक्तिरेखा प्रत्येक कलाकारांनी मनापासून सादर केल्या आहेत, नाटक गंभीर विषयावरील असले तरी ते हलके-फुलके करण्यात सर्वच कलाकरांचा मोठा वाटा आहे. नाटकातील व्यक्तिरेखा ह्या भिन्न / भिन्न स्वरूपाच्या असल्या तरी त्या एकमेकात गुंतलेल्या आहेत, प्रेक्षकांना वेगवेगळ्या दृष्टीकोनातून नाटक पसंत पडेल अशी आशा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.