Wakad : माहेरहून हुंड्यात बिअर बार आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून हुंडा म्हणून बिअर बार किंवा आईच्या संपत्ती मधील अर्धा हिस्सा आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार डिसेंबर 2015 ते जुलै 2018 या कालावधीत इंदापूर मधील इन्द्रेश्वर नगर येथे घडला. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जय हिंद कॉलनी, रहाटणी फाटा थेरगाव येथे राहणा-या 21 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार पती पवनकुमार घनवट, सासू संध्या घनवट आणि सासरे गोपाळ घनवट (सर्व रा. इन्द्रेश्वर नगर, इरिगेशन कॉलनी, इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिसेंबर 2015 मध्ये फिर्यादी महिला आणि पवनकुमार यांचा विवाह झाला. त्यानंतर पती, सासू आणि सासरे यांनी माहेरहून हुंडा आणण्याची वेळोवेळी मागणी केली. फिर्यादी महिलेच्या माहेरी बिअर बारचे दुकान आहे. त्यामुळे हुंडा म्हणून सासरच्या मंडळींनी पैसे न मागता विवाहितेच्या आईच्या संपत्ती मधील अर्धा हिस्सा आणावा किंवा बिअर बार सासरच्या मंडळींच्या नावावर करून घ्यावा, अशी अनोखी मागणी केली. त्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला रात्री अपरात्री घराबाहेर काढले. तसेच फिर्यादी यांच्या मुलाला स्वतःकडे ठेऊन घेतले, यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.