Pune- फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल तीन लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्युज- राहत्या फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 88 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज चोरी केला. ही घटना बुधवारी (दि.29) सकाळी साडेदहाच्या सुमारास लोहगाव येथे घडली.

याप्रकरणी तेजींदरसिंग खालसा (वय 65, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजींदरसिंग यांच्या राहत्या फ्लॅटचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसमाने फ्लॅटमधील सीसीटीव्ही डीव्हीआर, कपाटातील चांदीची भांडी, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 88 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.