Pune : मेडीकल कॉलेजमध्ये अॅडमिशन करून देण्याच्या बहाण्याने उकळले तब्बल 22 लाख रुपये

एमपीसी न्यूज – एका अज्ञात व्यक्तीने एसएमएसद्वारे एमबीबीएस कॉलेजात अॅडमिशन करून देण्याच्या बहाण्याने तब्बल 21 लाख 64 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने एसएमएसद्वारे फिर्यादी महिला (वय 42) त्यांच्या मुलामुलींना एमबीबीएसच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे खोटे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 7 मे 2018 ते 29 ऑगस्ट 2018 या दरम्यान तब्बल 20 लाख 14 हजार एवढी रक्कम उकळली. त्याचबरोबर इतर एकाकडून देखील 1 लाख 50 हजार अशी रक्कम मेडिकलला अॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने घेतली.  दोघांची मिळून तब्बल 21 लाख 64 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.