Pimpri : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – विवाहितेला माहेरहून पाच लाख रुपये आणण्यास सांगितले. विवाहितेने नकार दिल्याने पती, सासू आणि सासरा या तिघांनी मिळून तिला कामाला जाऊन पैसे आणून दे, अशी विक्षिप्त मागणी केली. तसेच यावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा प्रकार सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2018 दरम्यान पिंपरी मधील शिवानंदन हाऊसिंग सोसायटी येथे घडला.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती कपिल ईश्वरलाल हुंदलानी (वय 29), सासू सोना ईश्वरलाल हुंदलानी (वय 47) आणि सासरा ईश्वरलाल हुंदलानी (वय 53, सर्व रा. शिवनंदन हाऊसिंग सोसायटी, वाघेरे कॉलनी, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहितेकडे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला. माहेरहून पैसे आणायचे नसतील तर काम करून पैसे कमवून दे, अशी विक्षिप्त मागणी करत विवाहितेला काम करण्यास भाग पाडले. तसेच वेळोवेळी मारहाण करून मानसिक आणि शारीरिक छळ केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी फिर्यादी आजारी पडल्या असता, आरोपींनी त्यांना दवाखान्यात देखील नेले नाही. एवढा त्रास सहन करून महिलेने नांदण्यास नकार दिला नाही, तरीही आरोपींनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले. यावरून महिलेने तक्रार दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.