Pune : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे भव्य सामूहिक वाचन; १० हजार विद्यार्थी झाले सहभागी

एमपीसी न्यूज – ‘भारतीय संविधान दिवस ‘२६ नोव्हेंबर निमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ३० शैक्षणिक आस्थापनातर्फे भारतीय घटनेच्या उद्देशिकेचे (प्रीअॅम्बल) भव्य सामूहिक वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा केलेला विद्यार्थी आणि प्रत्येक राज्यातील वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेचे १० हजार विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकवर्ग या उपक्रमात सहभागी झाले. आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथील मैदानात हा कार्यक्रम 26 नोव्हेंबरला सकाळी  झाला. संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, नियामक मंडळाचे सदस्य, विभागप्रमुख, प्राध्यापक-शिक्षक वर्ग उपस्थित होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.