Hinjawadi : बालेवाडी स्टेडियममधून 40 हजारांचे साहित्य चोरीला

Material worth Rs. 40,000 stolen from Balewadi Stadium Krida Prabodhini.

एमपीसी न्यूज – बालेवाडी येथील स्टेडियममधून चोरट्यांनी 40 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली आहे.

सोमनाथ जगन्नाथ ढाकणे (वय 50, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी) यांनी बुधवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन ते बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान बालेवाडी स्टेडियममधील क्रीडा प्रबोधिनी उच्च माध्यमिक शाळा कुलूप लावून बंद होती.

या कालावधीमध्ये चोरट्यांनी प्रयोगशाळा आणि ग्रंथालयात वर चढून जिन्याचा दरवाजा कापून आत प्रवेश केला. आतील एलसीडी, डीव्हीडी, साऊंड असा एकूण 40 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

पोलीस उपनिरीक्षक अहिरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.