Maval : ताजे गावात जनावरांच्या गोठ्यात आढळला भला मोठा अजगर

एमपीसी न्यूज – मावळ (Maval) तालुक्यातील ताजे गावात शिवाजी केदारी यांच्या जनावरांच्या गोठ्यात भलामोठा अजगर आढळला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी त्याला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

NCP : व्यावसायिक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करा – अजित गव्हाणे

ताजे गावातील शिवाजी केदारी यांच्या गोठ्यात मोठा साप असल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य दक्ष काटकर यांना मिळाली. त्यांनी संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांना याबाबत माहिती देऊन संस्थेचे सदस्य काली केदारी, सोन्या वाडेकर, अर्जुन शिंदे, स्वामी शिंदे यांनी ताजे गावाकडे धाव घेतली.

शिवाजी केदारी यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याट कुटी ठेवलेल्या ठिकाणी जवळ पाच फुटांचा अजगर साप आढळून आला. त्याला सुरक्षितपणे पकडून अध्यक्ष अनिल आंद्रे, काली केदारी, सोन्या वाडेकर, अर्जुन शिंदे, स्वामी शिंदे यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

कुठेही वन्यप्राणी पक्षी आढळून आले तर वनविभाग (1926) अथवा वन्यजीव रक्षक मावळ संस्था (9822555004) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.