Maval : अभिनेता भूषण प्रधान याचे मतदारांना मतदानासाठी आवाहन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- लोकशाहीच्या सर्वोच्च उत्सवात सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रेटींनीही मतदानाचा हक्क बजावला. मुळच्या पिंपरी-चिंचवडच्या असलेल्या सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी शूटिंगच्या वेळापत्रकातून आवर्जून वेळ काढून मतदान केले. शिवाय नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान झाल्यानंतर सोशल मीडियावर सेल्फी, व्हिडिओ टाकून या कलाकारांनी मतदान करण्याला प्रोत्साहन दिले. अभिनेता भूषण प्रधान याने एमपीसी न्यूजशी बोलताना मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.


वडील शशिकांत प्रधान यांच्या सोबत भूषण प्रधान अभिनेता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.