Shirur: डॉ. अमोल कोल्हे व आढळराव पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Shirur: डॉ. अमोल कोल्हे व आढळराव पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व खासदार आढळराव पाटील यांनी सहपरिवार मतदान केले.

डॉ. कोल्हे यांनी जुन्नर नारायणगाव येथील कोल्हे मळा येथे तर आढळराव यांनी लांडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब मतदान केले. आढळराव यांच्या समवेत त्यांच्या पत्नी कल्पना, मुलगा अक्षय आणि अपूर्व आणि स्नुषा माधुरी उपस्थित होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदानाला आज (सोमवारी) सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सहपरिवार मतदान केले. जुन्नर नारायणगाव येथील कोल्हे मळा येथे मतदान केंद्रात त्यांनी मतदान केले.

प्रचारादरम्यान मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मतदारांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावा. मतदारराजा महाआघाडीला कौल देईल, असा विश्वास डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.