LokSabha Elections 2024 : विलास लांडे संपर्कात आहेत का? खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले….

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  राष्ट्रवादी काँग्रेसची ( LokSabha Elections 2024) उमेदवारी न मिळाल्याने भोसरीचे माजी आमदार विलास लांडे नाराज असल्याची चर्चा असतानाच याबाबतच्या प्रश्नावर शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सूचक विधान केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या  विचारांवर चालणारा मी मावळा आहे. महाराजांची शिकवण आहे मोहिम फत्ते झाल्यानंतर निकाल दिसला पाहिजे, मोहिमेची वाच्यता नको असे म्हणत लांडे यांच्या प्रवेशाचे संकेत दिले.

Kivale : किवळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

तीन दिवसांच्या सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज भोसरी मतदारसंघातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला सुरुवात केली. पत्रकारांशी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले की, नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मागीलवेळी भोसरीतून शिवाजीराव आढळराव यांना मताधिक्य मिळाले होते. ते कमी करण्यासाठी भोसरीत मतदारसंघ पिंजून काढत आहात का असे विचारले असता,  त्यावर डॉ. कोल्हे म्हणाले  मी शेतक-याचा मुलगा आहे.

त्यामुळे आज पेरले आणि आजच कापायला आले असे होत नाही. पाच वर्षे भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांवर आवाज उठविला. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी असो, रेडझोनचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने जनसंपर्क सुरु आहे. मी गेल्यावेळीही शरद पवार यांच्या पक्षाकडून आणि आजही त्यांच्याच पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. गेल्यावेळी समोरचे चित्र, चिन्ह वेगळे होते. समोरचा पक्ष वेगळा होता. आता स्वार्थासाठी पक्षामध्ये जो बदल झाला आहे ही जनता बघत आहे.

अनेकांना शरद पवार गटात आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेत आहात. माजी आमदार विलास लांडे नाराज आहेत. त्यांच्याशी काही संपर्क साधला आहे का असे विचारले असता डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या  विचारांवर चालणारा मी मावळा आहे. महाराजांची शिकवण आहे मोहिम फत्ते झाल्यानंतर निकाल दिसला पाहिजे, मोहिमेची वाच्यता ( LokSabha Elections 2024) नको.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.