Kivale : किवळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – जागृत मित्र मंडळ, समर्थ कॉलनी, विकास नगर, किवळे यांच्या ( Kivale) वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोहळा काल (गुरुवारी) उत्साहात साजरा करण्यात आला.

LokSabha Elections 2024 : मावळमध्ये दोन्ही शिवसेनेतच लढत!

मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला. महिलांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व लहान मुलांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या हस्ते महा शिव आरती घेण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मीय बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. लहान बालकांनी शिव घोषणा देऊन या कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. हा आनंद उत्सव साजरा करताना संपूर्ण वातावरण शिवमय झाले ( Kivale) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.