Maval: जागेअभावी पिंपरी शहरातील काही मतदान केंद्रात बदल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरातील मतदान केंद्रांमध्ये जागे अभावी काही बदल करण्यात आला आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने एक पत्रक काढले असून त्यामध्ये आठ बदललेल्या मतदान केंद्राची नावे आहेत.

मतदान केंद्र क्रमांक 16 ते 18 हे निगडी येथील महापालिकेच्या मुलांच्या शाळेतील मतदान केंद्र महापालिकेच्या मुलींची शाळा क्रमांक एक येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याच बरोबर 145 व 153 ही मतदानकेंद्रे चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील कमलानेहरू पार्क प्राथमिक शाळा येथून पुणे-मुंबई महामार्गालगतच्या दर्शन अकादमी शाळा एम्पायर इस्टेट फेज एक येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तर 149 व 151 ही मतदान केंद्रे कमला नेहरू प्राथमिक विद्यालयातून ते चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील महात्मा फुले शाळा क्रमांक एक (बहिरवाडे) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

तसेच 146, 150, 152, 154, 156 व 158 ही मतदान केंद्रे ही चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील महात्मा फुले शाळा क्रमांक 2 येथून थेट बॅडमिंटन हॉल एमआयडीसी ऑफिस चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ स्थलांतरित करण्यात आली आहेत. तसेच 178 ते 183 ही मतदान केंद्रे लोकमान्य मेडिकल फाऊंडेशन होमियोपॅथिक कॉलेज चिंचवड येथून ते ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल चिंचवड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

214 हे मतदान केंद्र महापालिकेच्या प्राथमिक शाळा भाटनगर येथून ते शिलाबाई साबळे समाजमंदिर भाटनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. 225 ते 230 ही मतदान केंद्रे आर्य समाज शाळा पिंपरी येथून जयहिंद प्रायमरी स्कूल पिंपरी कॅम्प येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. 280 ते 283 ही मतदानकेंद्रेही जय हिंद हायस्कूल पिंपरी येथून ती मंघनमल उधाराम कॉमर्स कॉलेज पिंपरी कॅम्प येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या बदलाची मतदारांनी दखल घेत योग्य मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.