Maval Corona Update : मावळात आज 10 नव्या रुग्णांची नोंद; 9 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.5) 10 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 09 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 134 आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही. वडगाव नगरपंचायत व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत प्रत्येकी 04 रूग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 134 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8380 झाली आहे. तर दिवसभरात 09 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 08 रुग्ण सापडले, तर ग्रामीण भागात कामशेत व कुसगाव बुद्रुक येथे प्रत्येकी 01 रूग्ण सापडला.आतापर्यंत 8014 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2567, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1662 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 555 रुग्ण सापडले आहेत.

आजपर्यंत शहरी भागात 4784 रुग्ण तर ग्रामीण भागात 3596 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.