Maval Corona Update : मावळात आज 16 नव्या रुग्णांची नोंद; 6 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.27) 16 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 06 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 83 आहे.

लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 12 रूग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 83 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8283 झाली आहे.

आज दिवसभरात 06 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 4714 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात गहुंजे येथे 03 तर तळेगाव ग्रामीण 01 रूग्ण सापडला.

शहरी भागात 12 रुग्ण सापडले. सध्या 83 रुग्ण सक्रिय आहेत. 7976 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2547, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1625 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 543 रुग्ण सापडले आहेत.

आजपर्यंत शहरी भागात 4714 रुग्ण तर ग्रामीण भागात 3569 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.