Maval Corona Update : मावळात आज 200 नवीन रुग्णांची नोंद; 167 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.8) 200 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 167 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 322 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1753 आहे.

शहरी भागात 104 तर ग्रामीण भागात 96 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 49  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 46 रुग्ण सापडला. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 9 रुग्ण सापडले .

मावळ तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंत ची एकूण संख्या 15,343 झाली आहे. तर दिवसभरात 167 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कुसगाव बुद्रुक 22, कळकराई 16, कामशेत 15, इंदोरी 7, जांभवडे 5, कुरवंडे 5, कुणे नामा 2, माऊ 2, नाणे 2, वडेश्वर 2, देवले 2, सांगिसे 2, वडगाव 2, आंबळे, आंबी, औंढोली, बेलज, भोयरे, ब्राम्हणवाडी साते, डोंगरगाव, नवलाख उंब्रे, सांगावडे, शेवती, सुदवडी व टाकवे खुर्द प्रत्येकी 1 एकूण 96 रुग्ण सापडले.

आतापर्यंत 13,268 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5138 , लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2987 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 840 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 8965 रुग्ण तर ग्रामीण भागात 6378 रुग्ण आढळून आले आहेत. 2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.48  टक्के आहे तर मृत्यू दर 2.1  टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 478 , लोणावळा नगरपरिषदमध्ये 400 , वडगाव नगरपंचायतमध्ये 57  व ग्रामीण भागात 818  असे एकूण 1753  रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.