Maval Corona Update : मावळात आज 238 जणांना डिस्चार्ज ; 155 नव्या रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.18) 155  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 238  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 352  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2319 आहे.

आज शहरी भागात 69 तर ग्रामीण भागात 86  रुग्ण सापडले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 59  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 3 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 7 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 20,712  झाली आहे. तर दिवसभरात 238 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कुसगाव बुद्रुक 24 , कुणे नामा 15, मळवली नामा 8, कामशेत 6, अजीवली 4, पाटण 4, बेबड ओहळ 3, पिंपळोली 3, भाजे 2, कुरवंडे 2, नागाथली 2, ताजे 2, सांगावडे, शिळिंब, टाकवे बुद्रुक, वेल्हावळी, ब्राम्हणवाडी साते व चांदखेड प्रत्येकी 1 असे एकूण 86  रुग्ण सापडले.

17,694 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत आतापर्यंत 352 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 6785, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3657 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1081 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 11,523रुग्ण तर ग्रामीण भागात 9189 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 85.43टक्के आहे तर मृत्यू दर 1.73 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 903 लोणावळा नगरपरिषदमध्ये 245 वडगाव नगरपंचायतमध्ये 106  व ग्रामीण भागात 1065 असे एकूण 2319 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.