Maval Corona Update : मावळ तालुक्यात मंगळवारी 51 नवीन रुग्ण

मावळ तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा एक हजारच्या पुढे गेला आहे. ; 51 new patients in Maval taluka on Tuesday

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा एक हजारच्या पुढे गेला आहे. आज (मंगळवारी, दि. 11) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 205 झाली आहे. तर दिवसभरात 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तीन रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 31 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 20 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत नऊ, वराळे तीन, कान्हे, सुदुंबरे येथील प्रत्येकी दोन आणि चांदखेड, टाकावे बु., कुसगाव म पा, नाणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 17, लोणावळा शहरात 8 आणि वडगावमध्ये 6 रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 205 रुग्णांमध्ये सध्या 444 रुग्ण सक्रीय आहेत. तर 717 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 393, लोणावळा नगरपरिषद 130 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 85 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 597 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 421 आणि होम आयसोलेशनमध्ये 23 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.