Maval Corona Update : मावळ तालुक्यात शुक्रवारी 57 नवीन रुग्ण; 53 जणांना डिस्चार्ज

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 37 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 20 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शुक्रवारी, दि. 21) कोरोनाचे 57 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 608 झाली आहे. तर दिवसभरात 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण धामणे (पुरुष, 70 वर्ष) येथील आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 37 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 20 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत, वराळे, सोमटणे येथील प्रत्येकी 4, इंदोरी 3, टाकवे बु., सुदुंबरे, धामणे, शिरगाव, बेबडओहळ येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 25 लोणावळा शहरात 9 आणि वडगावमध्ये 3 रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 608 रुग्णांमध्ये सध्या 345 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 202 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 534, लोणावळा नगरपरिषद 178 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 120 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 776 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.