Pimpri corona Update: शहरात आज 1 हजार 82 नवीन रुग्ण, 450 जणांना डिस्चार्ज, 20 मृत्यू

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 39 हजार 859 झाली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णवाढ सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 1038 आणि पालिका हद्दीबाहेरील 44 अशा 1082 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 39 हजार 859 झाली आहे.

तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 450 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज शहरातील 15 आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा  20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  त्यामध्ये  भोसरी (पुरुष 51 वर्षीय, पुरुष 46 वर्षीय, पुरुष 46 वर्षीय), चिखली (स्त्री 47 वर्षीय, पुरुष 70 वर्षीय), पिंपळेगुरव (पुरुष 45 वर्षीय), पिंपरी (स्त्री 36 वर्षीय), मासुळकर कालनी (पुरुष 78 वर्षीय), रुपीनगर (पुरुष 41 वर्षीय), मोशी (पुरुष 75 वर्षीय), निगडी (पुरुष 60 वर्षीय), तळवडे (स्त्री 34 वर्षीय), च-होली (पुरुष 62  वर्षीय, पुरुष 70 वर्षीय), सांगवी (पुरुष 65  वर्षीय), विश्रांतवाडी (पुरुष 64 वर्षीय, पुरुष 80 वर्षीय), पाषाण (स्त्री 62 वर्षीय, पुरुष 75 वर्षीय), राजगुरुनगर (पुरुष 65 वर्षीय) येथील रहिवाशी आहेत.

शहरात आजपर्यंत 39 हजार 859 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील  26 हजार 220 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील  751 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 150 अशा 901  जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 6954 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.