Maval Corona Update : मावळात दिवसभरात 60 नवे रुग्ण; 44 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.8) 60 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 498 इतकी आहे.

सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 710 आहे. शहरी भागात 27 तर ग्रामीण भागात 33 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 15 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 11रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 01 रुग्ण सापडला.

मावळ तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 24,575 झाली आहे. तर दिवसभरात 44 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात करंडोली 4, कुसगाव बुद्रुक 3, दुधीवरे 3, नानोली तर्फे चाकण, इंदोरी, तळेगाव दाभाडे ग्रामीण व वराळे प्रत्येकी 02, निगडे, शिरगाव, सोमाटणे, चिखलसे, नाणे, कामशेत, मोहितेवाडी, वाकसाई, चांदखेड, साळुंब्रे, माळवाडी, पाथरगाव, ओझर्डे, टाकवे बुद्रुक व किवळे प्रत्येकी 01 असे एकूण 33 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 23,366 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,803 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,110 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,259 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 13,163 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,412 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.08 टक्के आहे तर मृत्यू दर 2.03 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 187, लोणावळा नगरपरिषदमध्ये 108, वडगाव नगरपंचायतमध्ये 39 व ग्रामीण भागात 376 असे एकूण 710 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.