Maval Corona Update : तालुक्यात एका दिवसात 72 नवे रुग्ण तर 36 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि. 21) 72 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण संख्येच्या अर्धे रुग्ण आज बरे होऊन घरी गेले. ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

आज एक रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असुन आतापर्यंत 254 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या 1225 आहे. शहरी भागात 12 तर ग्रामीण भागात 60 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 6 रुग्ण सापडले.

वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 6 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11828 झाली आहे. तर दिवसभरात 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात नवलाख उंब्रे 11, वराळे 9, तळेगाव दाभाडे ग्रामीण 7, बऊर 6, कामशेत 6, इंदोरी 5, कान्हे 4, धनगव्हाण 3, शिवली 3, नानोली तर्फे चाकण 2, जांबवडे 2, साळुंब्रे व माळवाडी प्रत्येकी 1 असे एकूण 60 रुग्ण सापडले. 10349 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3740, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2312 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 744 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 6796 रुग्ण तर ग्रामीण भागात 5032 रुग्ण आढळून आले आहेत.5 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 87.05 टक्के आहे तर मृत्यू दर 2.15 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 234, लोणावळा नगरपरिषद मध्ये 311, वडगाव नगरपंचायत मध्ये 67 व ग्रामीण भागात 613 असे एकूण 1225 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.