Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 84 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 9) कोरोनाचे 84 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 2 हजार 553 झाली आहे. तर दिवसभरात 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बुधवारी कामशेत (पुरुष, 64 वर्ष) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 57 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 27 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत पाच, माळवाडी 5, निगडे, कान्हे, कुणे नामा येथील प्रत्येकी 2, चांदखेड, टाकवे बु, वराळे, ब्राह्मणवाडी साते, नायगाव, चिखलसे, येळसे, वरसोली, ब्राह्मणवाडी करंजगाव, बेलज येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 25, लोणावळा शहरात 27 आणि वडगावमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 2 हजार 553 रुग्णांमध्ये सध्या 658 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 796 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 831, लोणावळा नगरपरिषद 438 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 164 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 120 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.