Maval Corona Update : मावळात आज केवळ 8 रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत असून तालुक्यात गुरुवार (दि.29) कोरोनाचे 8 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 209 मृत्यू झाले आहेत.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7410  झाली आहे. तर दिवसभरात 27  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 3  रुग्ण शहरी भागात तर 5  रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण 2 टाकवे बुद्रुक, सुदुंबरे व सुदवडी प्रत्येकी 1 असे एकूण 5 रुग्ण आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 2  व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1  असे एकूण 3  रुग्ण सापडले तर लोणावळा नगरपरिषद हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. 200  रुग्ण सक्रिय आहेत. 7001 आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे .

मावळ तालुक्यात आज कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2146, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1471 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 511 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 4128  रुग्ण तर ग्रामीण भागात 3282  रुग्ण आढळून आले आहेत.

तर एका रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे व कोविड समन्वयक डॉ. गणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.