Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 111 नवीन रुग्णांची भर

आज  मावळात एकूण सहा रुग्णांचा मृत्यू झाला.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शनिवारी ) कोरोनाचे तब्बल 111 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 2 हजार 288 झाली आहे. तर दिवसभरात 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज  मावळात एकूण सहा रुग्णांचा मृत्यू झाला. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 85  रुग्ण शहरी भागातील आहेत, तर 26  रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात सर्वाधिक 13  रुग्ण एकट्या कामशेत येथे आढळले. तर सोमाटणे येथे 2 रुग्णांची नोंद झाली.

त्याचबरोबर शिरगाव, वराळे, कुणे नामा, कार्ला, गेव्हेडे आपटी धामणे, इंदोरी, कान्हे, भाजे, माळवाडी, कुसगाव बु. येथील प्रत्येकी एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाली आहे.

शहरी भागातील तळेगाव शहरात 8 आणि वडगावमध्ये 5, तर लोणावळा नगरपरिषद हद्दीत ७२ रुग्णांची नोंद झाली.

एकूण 2 हजार 288 रुग्णांमध्ये सध्या 611  रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 587 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 90  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 758, लोणावळा नगरपरिषद 340 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 155 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1035  रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.